Press "Enter" to skip to content

शालेय प्रवेशउत्सव जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा


प्रतिनिधी (प्रेम म्हात्रे)

जानकीबाई जनार्दन ठाकूर विद्यालयात शालेय प्रवेश उत्सव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालया तर्फे औक्षण करून त्यांना आजच्या पहिल्या दिवशी मोठ्या आनंदात शाळेय प्रवेश दिला. तद्नंतर काही मनोरंजक कृती विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या व विद्यालयासमोर मांडण्यात आलेल्या वेलकम स्टुडन्ट म्हणजेच सेल्फी पॉईंट्स मध्ये विद्यार्थ्यांचे छायाचित्र घेण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस हा त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. पहिल्या दिवशी विद्यार्थी संकल्प करतात मी शालेय शिस्तीचे मी पालन करीन दिलेला अभ्यास मनःपूर्वक करेन, शिक्षकांचा आदर करेन, शिक्षकांशी प्रेमाने बोलेन, या समवेत शिक्षणाच्या प्रगतीने माझ्यासोबत राष्ट्राचा विकास करेन हाच संकल्प करत मोठ्या दिमाखात शाळेत प्रेवेश करतात.

सदर उपक्रम हा विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मेहनतीने व पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व विद्यार्थ्यांनी केलेल्या पहिल्याच दिवशीच्या प्रवेशाने पार पडला. अशाप्रकारे शालेय प्रवेशोत्सव हा आवरे येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल विद्यालय मोठ्या उत्साहात साजरा झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.