Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत पदकांची कमाई

कोच अद्वैत शेंबवणेकरांच्या मार्गदर्शनाखाली सई कारंडे, विहंग पालवे, बतुल साखरवाला आणि अहाना सोमण चमकले

पनवेल: जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा २०२६’ मध्ये पनवेलमधील ‘एमपीएसए (MPSA) बॉक्सिंग क्लब’च्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा यशाची मोहोर उमटवली आहे. मुख्य प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांच्या कुशल व खंबीर मार्गदर्शनाखाली उतरलेल्या या चमूने स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत विविध पदकांची कमाई केली आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत एमपीएसए क्लबच्या सई कारंडे आणि विहंग पालवे यांनी ‘सुवर्ण पदक’ पटकावले. त्याचप्रमाणे बतुल साखरवाला हिने ‘रौप्य पदक’ मिळवले, तर अहाना सोमण हिने आपल्या जिद्दीच्या जोरावर ‘कांस्य पदक’ जिंकून क्लबच्या शिरपेचात आणखी एक मानाचे पदक जोडले.

या सुवर्ण यशासोबतच सई करंडे हिची आगामी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशामागे प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर यांचे अथांग परिश्रम आणि त्यांनी खेळाडूंकडून करून घेतलेली कसून तयारी कारणीभूत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.