Press "Enter" to skip to content

नगरसेविका शिवानी घरत यांच्या मागणीला यश ; लवकरच सुरू होणार रेल्वे स्टेशन परिसरातील पोलीस चौकी


पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः गेल्या काही महिन्यापासून पनवेल रेल्वे स्टेशन समोर असलेली पोलीस चौकी विविध कारणांमुळे बंद होती याबाबत स्थानिक नगरसेविका ॲड.शिवानी घरत यांनी शासनाकडे तसेच पनवेल महानगरपालिकेकडे पत्रव्यवहार करून सदर चौकी सुरू करण्याची मागणी केली होती.

या मागणीला यश आले असून या संदर्भात नुकतेच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे तसेच इतर नगरसेविकांनी या विभागाची पाहणी करून आवश्यक असलेल्या त्रुटी लवकरात लवकर दूर करून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी सुविधा पुरवून ही बंद असलेली पोलीस चौकी सुरू करण्याचे ठरविण्यात आल्याने नगरसेविका ॲड.शिवानी घरत यांनी आपल्या मागणीची दखल घेवून ही चौकी पुन्हा सुरू होत असल्याने त्यांनी आभार मानले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.