Press "Enter" to skip to content

वाघ्रण वाडी जंगल परिसरामध्ये अवैध्य दारू वरती नागोठणे पोलीस ठाण्याची धडक कारवाई

सविस्तर वृत्त असे की गुप्त मिळाल्या बातमीच्या आधारे वाघ्रण वाडी परिसरामध्ये अवैद्य रित्या दारू निर्मिती करून विक्री करता बाळगली जात आहे अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस आयुक्त अभिजीत शिवतरे, उपविभागीय अधिकारी पेन जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स. पो. निरिक्षक सचिन कुलकर्णी व पथक तसेच वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव व पथक यांनी वाघ्रण वाडी जंगल परिसरामध्ये पंधरा किलोमीटर आत जंगलात जाऊन गावठी हातभट्टी दारूचे अड्डा उध्वस्त करून समूळ उच्चाटन केले.

सदर प्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १०५/२०२६ कलम ६५ इ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यांमध्ये एकूण २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनकर हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.