
पनवेल /प्रतिनिधी : –
तळोजे येथे राहणारे उर्वशी चौहान व गिरीश चौहान दांपत्याचा मुलगा मीर याचा अपघात झाल्याने तो मेडिकव्हर हॉस्पिटल खारघर येथे ऍडमिट होता.त्याचा हॉस्पिटलचा खर्च चौहान यांची आर्थिक परिस्तिथी हालाकीची असल्याने ते करू शकत न्हवते, तसे त्यांनी अनेकांना माध्यमाद्वारे सर्वांना संपर्क साधला होता. अशा परिस्थितीत शिवसेना उपमहानगर संघटक राहुल गोगटे यांच्याशी त्यांनी संपर्क साधून सहकार्य करण्याचे सांगितले असता गोगटे यांनी त्वरित शिवसेना उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याशी संपर्क साधला, अनेकदा फोनद्वारे व पत्रव्यवहार करून त्यांनी मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्याकडून मीर गिरीश चौहान याला जास्तीत जास्त मदत मिळण्याकरीत प्रयत्न केले असता त्यांना त्यांच्या बिलातून 1लाख रुपयांची सूट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे तसेच पनवेल उपमहानगर समनव्ययक राहुल गोगटे यांच्या माध्यमातून मिळाली.
याबद्दल चौहान दांपत्याने लेखी पत्राद्वारे त्यांच्या या कठीण परिस्थितीत मदत व मार्गदशन झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मंगेश चिवटे तसेच राहुल गोगटे यांचे आभार मानले आहेत .


Be First to Comment