
पेण, ता. १० (वार्ताहर) : सविधान अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा प्रतिष्ठान संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डाँ.रविंद्र घोसाळे यांच्या संकल्पनेनुसार नुकतेच हे महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये पेण येथील भारतीय बौद्ध महासभेच्या माझी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ प्रवचनकार संपदा चव्हाण यांना भिमरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्याशी एकनिष्ठ राहून गेली अनेक वर्ष त्यांनी बौद्ध महासभेच्या धार्मिक संघटनेत काम करत असताना आजवर संपदा चव्हाण यांनी विविध पदांवर काम केले असून त्या उत्कृष्ट वक्त्या आहेत बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार अधिक व्हावा या दृष्टिकोनातून त्यांनी रायगड जिल्ह्यात महिलांचे संघटन मजबूत केले आहे त्यांच्या या कार्याचा गवगवा पाहता सेवा प्रतिष्ठान संगमेनर तर्फे त्यांना भिमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. किरण लहामटे, अँड संघराज रुपवते, मुख वक्ते प्रामुकुंद भारसाकळे, भन्ते.के.सुमेध, डॉ.रवींद्र घोसाळे आदि उपस्थित होते.


Be First to Comment