Press "Enter" to skip to content

बाळ माने यांच्या फोटोला शिवसेना उ बा ठा महिला आघाडीने मारले जोडे


पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः पैशाच्या लालसेपोटी विकल्या गेलेल्या बाळ मानेंचा जोरदारपणे आज पनवेल येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर महिला आघाडीने निषेध करून त्यांच्या फोटोला चप्पला मारल्या.

ज्या मातोश्रीने भावाप्रमाणे प्रेम दिले अशा मातोश्रीचा विश्वासघात करून कोकण विधानपरिषद मध्ये उमेदवारी घेवून ती उमेदवारी विरोधकांना विकून माघार घेणाऱ्या बाळ मानेंचा जोडे मारुन निषेध केला.

यावेळी उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्यासह सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, रामदास पाटील, महानगरप्रमुख ॲड.समाधान काशिद, गटनेत्या लिना गरड, मा.जिल्हाप्रमुख शिरिष बुटाला, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, ज्ञानेश्वर बडे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, रामदास गोवारी, सुर्यकांत म्हसकर, प्रदीप केणी, नगरसेविका प्रगती पाटील, रितीशा गोवारी, प्रिया गोवारी, मेघना घाडगे, आर्या जाधव, उत्तम मोर्बेकर, नितीन गावंड, महिला आघाडीच्या संगीता राऊत, उज्वला गावडे, ज्योती मोहिते, मालती पिंगळा, सानिका मोरे, समिक्षा पांगम, किरण सोनावणे आदींसह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.