Press "Enter" to skip to content

जागतिक भूक दिनानिमित्त मलाबार ग्रुपचा उपक्रम

‘हंगरफ्रीवर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश 

पनवेल (प्रतिनिधी) जागतिक भूक दिनानिमित्त मलाबार ग्रुपच्या मानवतावादी उपक्रम ‘हंगरफ्रीवर्ल्ड’ने आपल्या स्ट्रीटमील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामचा प्रभाव “रिहॅबिलिटेशन इम्पॅक्ट रिपोर्ट: इम्पॅक्ट स्टोरीज – एका दैनंदिन जेवणामुळे कसे बदलते आयुष्य” या अहवालाद्वारे अधोरेखित केला. या अहवालात, थनलसंस्थेद्वारे प्रत्यक्ष स्तरावर राबविण्यात येणाऱ्या दैनंदिन अन्न वितरण मोहिमेमुळे रस्त्यावर राहणाऱ्या असुरक्षित व्यक्तींना बचाव, वैद्यकीय मदत, निवाऱ्याची सुविधा, सन्मानाची पुनर्स्थापना आणि कुटुंबीयांशी पुनर्मिलन कसे शक्य झाले, हे नोंदविण्यात आले आहे.

स्ट्रीटमील डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामची सुरुवात पौष्टिक अन्नाची नियमित उपलब्धता करून भुकेच्या समस्येला उत्तर देण्यासाठी करण्यात आली होती. कालांतराने हा उपक्रम अधिक सखोल काळजी आणि सहाय्याचा दुवा बनला आहे. दैनंदिन संपर्कामुळे क्षेत्रीय कार्यकर्त्यांना लाभार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करता येतो, त्यांच्या आरोग्य आणि वर्तनातील बदल ओळखता येतात, अडचणींची जाणीव होते आणि त्यांना पुनर्वसन सेवांशी जोडता येते. या अहवालात कार्यक्रमाच्या मुख्य विश्वासाला अधिक बळ देण्यातआले आहे की, सातत्याने आणि मानवी संवेदनशीलतेने दिलेले एक जेवण मोठ्या परिवर्तनाची सुरुवात ठरू शकते.

हा कार्यक्रम सध्या भारतातील 20 राज्यांमध्ये आणि सहाGCC देश, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि झांबियायांसह नऊ देशांमध्ये कार्यरत आहे. मायक्रो लर्निंग सेंटर्स आणि स्ट्रीटमील डिस्ट्रीब्युशन प्रोग्राम यादोन प्रमुख उपक्रमांद्वारे 1,43,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना मलाबार ग्रुपचे अध्यक्ष एम. पी. अहमद म्हणाले, “एक जेवण साधे वाटू शकते, परंतु जेव्हा ते सातत्याने आणि मानवी संवेदनशीलतेने दिले जाते, तेव्हा ते फक्त अन्न राहत नाही. हंगरफ्रीवर्ल्डच्या माध्यमातून आम्ही पाहिले आहे की नियमित संपर्क कसा विश्वास निर्माण करतो आणि तो विश्वास पुनर्वसन, आरोग्यसेवांपर्यंत पोहोच, भावनिक आधार आणि सन्मान पुनर्स्थापनेचा पाया बनतो.  या कथा असुरक्षित समुदायांशी सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व अधोरेखित करतात, जिथे करुणा आणि सातत्य एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याची दिशा अर्थपूर्णपणे बदलू शकते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.