

पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी आज (दि. ४ जून) प्रभाग क्रमांक १४ मधील विविध ठिकाणी नालेसफाई व पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचू नये, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच नाल्यांमधील गाळ व अडथळे तातडीने दूर करण्यात यावेत, यासाठी महापौरांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता आणि गती यावरही त्यांनी भर दिला.
प्रभागातील विकासकामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी भाजपाचे चारही उमेदवार सातत्याने पाठपुरावा करत येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले.
या पाहणी दौऱ्यावेळी पनवेल भाजपा ओबीसी सेल अध्यक्ष सतिश पाटील, माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, भाजपा पनवेल मंडल सरचिटणीस रुपेश नागवेकर, उपाध्यक्ष अतुल भगत, प्रभाग अध्यक्ष गणेश म्हात्रे, भाजपा नेते शैलेश म्हात्रे, रोहीत आठवणे, रुपेश आंबोलकर, अभिजित जाधव, सचिन गमरे, युवा मोर्चा अध्यक्ष कुणाल पाटील व स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महानगरपालिका अधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री. मयुरेश नेतकर यांनी सांगितले कि, प्रभाग १४ मधील नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी महापौर नितीनभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव जनतेसोबत उभा आहे.



Be First to Comment