Press "Enter" to skip to content

केंद्र सरकारच्या मान्यतेने भारतीय कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी जिनिव्हा येथील आय एल ओ परीषदेत सोडली स्वतःची छाप

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) तर्फे जागतिक परीषदेचे १ जून ते १२ जून २०२६ रोजी जिनिव्हा (स्विझर्लंड) येथे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये जगभरातून कंपनीचे मालक, देशाचे कामगार मंत्री, कामगार प्रतिनिधी असे ९००० प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. या परिषदेसाठी INTUC या राष्ट्रीय संघटनेतर्फे न्यू मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्रशेठ घरत यांना केंद्र सरकारच्या मान्यतेने भारतीय कामगारांचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला आहे.

त्यासाठी ते १ जून आपला वाढदिवस बाजूला ठेवून ३० मे रोजी जिनिव्हा येथे रवाना झाले. या परिषदेसाठी सन २०१८ मधे सुद्धा त्यांची निवड झाली होती. या परिषदेमधे जागतिक पातळीवर कामगारांच्या समस्यांवर चर्चा केली जाते व तसे कायदे बनविले जातात. कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारां प्रति करत असलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांची दुसऱ्यांदा ILO च्या जागतिक परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. 

या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेत सहभागी झालेल्या महेंद्र घरत यांनी स्वतःची एक वेगळी छाप उमटवली आहे. अनेक देशांच्या कामगार संघटनांच्या नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महेंद्र घरत यांचा आजपर्यंतचा अनुभव पाहता त्यांना परदेशात स्थायिक होण्याची ऑफर अनेकदा देण्यात आली आहे. परंतु आपल्या देशावरील प्रेम आणि त्यांनी जिव्हाळ्याने जोडलेली नाती सोडून आपण कुठेही जाऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.