Press "Enter" to skip to content

तातडीने काम सुरू करत असल्याचे दिले लेखी पत्र

हक्काच्या रस्त्यासाठी माडप येथील आदिवासी बांधव रस्त्यावर ; आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला आली जाग

पेण- दि. 27 ( प्रतिनिधी ) -: खालापूर तालुक्यातील माडप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव गेली अनेक वर्ष रस्त्यापासून वंचित असल्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता मंजूर असून देखील ठेकेदाराच्या चालढकलपणामुळे रस्ता होत नसल्याने आपल्या हक्काच्या रस्त्या करिता आदिवासी बांधवांनी दिनांक 26 मे रोजी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास सुरुवात करत आत्मदहन करण्याचा इशारा दिला असता सदर इशाऱ्यामुळे येथील संबंधित प्रशासनाला जाग आली असून तातडीने या रस्त्याचे काम सुरू करत असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिल्याने सदर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना भाग दोन अंतर्गत माडप ते माडप ठाकूरवाडी रस्ता मंजूर होऊन 2024 सालीच या कामाची वर्क ऑर्डर सुद्धा निघाली परंतु मे. ए. जी. सी. इन्फोकॅन्स प्रा. ली. कंपनीच्या ठेकेदाराने आजतागायत हे काम न केल्याने या भागातील आदिवासी बांधव, विद्यार्थी, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला अशा सर्वांना खडतर प्रवास करावा लागत होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या आदिवासी बांधवांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात करत येथेच आत्मदहन करणार असल्याचा इशारा देताच संबंधित प्रशासनाला जाग येऊन त्यांनी तातडीने हे काम सुरु करण्याबाबतचे लेखी पत्र आंदोलकांना दिले असता सदरचे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.पण संबंधित ठेकेदारांनी वेळेत काम सुरू केले नाही तर पुन्हा एकदा याहून अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपस्थित आंदोलनकर्ते आदिवासी बांधवांनी दिला आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.