Press "Enter" to skip to content

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

NEET UG 2026 परीक्षेच्या पेपर लीक व केंद्र सरकारच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ पनवेल युवक काँग्रेसची निदर्शने 

पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने  NEET UG 2026परीक्षेच्या पेपर लीक व केंद्र सरकारच्या घोटाळ्याच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. देशातील लाखो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी NEET परीक्षेची तयारी करत असतात. 

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण मिळता कामा नये. हेमराज म्हात्रे यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली व संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असे सांगितले.

या महत्त्वपूर्ण आंदोलनात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री शिवराज जी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. हेमराज म्हात्रे अध्यक्ष पनवेल जिल्हा युवक काँग्रेस, नेहल देशमुख सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व प्रभारी पनवेल जिल्हा युवक काँग्रेस, प्रशांत बालकृष्ण पारवे सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस,विश्वजित पाटील माजी सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, ईमाम सय्यद सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, रुपेश घरत, शहीद मुल्ला,दीपंकर चिखलेकर, अक्षय शिंदे तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.