
वाशी दि. 19 (प्रतिनिधी) ः पेण तालुक्यातील वाशी येथील सागर विद्यालय वाशी शाळेचा माजी विद्यार्थी संघाचा स्नेह मेळावा रविवार दि.17 मे रोजी पेण तालुक्यातील नेचर टच या फार्म हाऊसवर शाळेच्या जुन्या गोड आठवणींत नुकताच संपन्न झाला.
घरी कुटुंबाचे प्रेम आणि मैत्रीचे नाते काही वेगळेच असते. 28 वषार्ंची अतूट मैत्री. या मैत्रीचे रक्ताचे नाते नसताना देखील ही मैत्री आपुलकीचे व जिव्हाळ्याचे नातं निर्माण करते. ही खरी मैत्री आणि त्याचे कारणही तसेच आहे. मात्र आपल्या दहावी बॅचचे विद्यार्थी मित्र राजकारण, समाजकारण, उद्योग, नोकरी, सहकार, शिल्पकला, पत्रकारिता, फोटोग्राफी, शैक्षणिक अशा जीवनाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये कार्यरत असून, तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसाही निर्माण केला आहे. आता सर्वांमध्ये गरुडाच्या पंखांचे बळ आहे. आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण गावालाच अभिमान वाटेल अशी उंच उंच भरारी मारली आहे.
प्रत्येकामध्ये सहकार्याची भावना असून, प्रत्येकजण सहकार्यातून अनेकांना नवी उमेद देण्याचे काम करत आहेत. हा स्नेह मेळावा म्हणजे एक आनंद सोहळा व स्नेह भेटीचे सुंदर स्वरूप आहेे. 28 वर्षात आपण एकत्र आलो. याचा सर्वांना खूप आनंद असून, प्रत्येकाचा जीवन प्रवास कसा आहे, हे सर्वांनाच समजले. यापुढे आपण भेटत राहू अशी प्रत्येकाची इच्छा आहे. यावेळी प्रत्येकाचे स्वागत व परिचय करुन देण्यात आला.
सागर विद्यालय वाशी शाळेतून दहावी पास होऊन गेलेले विद्यार्थी जवळजवळ 28 वर्षांनी एकत्र आले. दरम्यान सर्व माजी विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनाचे उद्दिष्ट समोर ठेवून शाळेत केलेली मौज, मजा, मस्ती, काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, कधी कधी शिक्षक शिकवीत असताना केलेली गंमत या सार्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत, सर्वांनीच गमतीदार संवाद साधले. मात्र आयुष्याशी झगडताना जीवनात घडलेल्या भावनात्मक प्रसंगांचीही यावेळी सर्वांनी आठवण करून दिली. एकंदरीत या माजी विद्यार्थ्यांची अत्मियता पाहता हा स्नेह मेळावा संपन्न झाला. सर्व विद्यार्थी-विद्यार्थांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. या स्नेह मेळाव्यासाठी, सुनिल पाटील, मिताली म्हात्रे, संतोष पाटील, प्रसाद पाटील, रोशन म्हात्रे, दिनेश थवई, संदेश ठाकूर, शुभदा शिर्के, राजेश्री पाटील, वैभव पाटील, संदीप पाटील, अजित म्हात्रे, योगिता पिंगळे सुशील पाटील, विकल पाटील, गिरीष म्हात्रे, प्रवीण केणी शनिदास पाटील, पुष्पा कोठेकर जयंद्रथ पाटील (लालू ), सुष्मा थवई -केणी, अविनाश म्हात्रे, विजय विठोबा म्हात्रे, निलेश म्हात्रे, रणजित पाटील, सरिता पाटील, गणेश ठाकूर, प्रवीण ठाकूर , शिल्पा ठाकूर, श्रीकांत पाटील, शुभांगी ठमके, सुभाष पाटील यावेळी उपस्थित होते.




Be First to Comment