Press "Enter" to skip to content

पहिल्या नवी मुंबई ग्लोबल समिटची शानदार सांगता

यू बिझनेस मिट ने केले होते आयोजन ; भारत आणि थायलंड दरम्यान व्यापार होणार वृद्धिंगत

 नवीन मुंबई मधील यू बिझनेस मीट यांच्या वतीने आयोजित नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रातील उद्योजकांनी उपस्थित रहात या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान व्यापार उद्योजकता वृद्धिंगत व्हावी या हेतूने या बिझनेस समिटचे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड या दोन देशातील व्यवसाय निष्णात प्रभुतींच्या चर्चांमधून अनेक नवनवीन उद्योजक आणि व्यापार संधी उदयास येण्याचे यामुळे चिन्ह निर्माण झाली आहेत.  
      

विविध व्यवसाय आस्थापनांना व्यवसाय सुलभता प्रदान करण्याच्या हेतून यू बिझनेस मिट ही संस्था काम करत असते. फाउंडर वैभव सोनटक्के आणि को फाउंडर रवींद्र प्रताप गुप्ता,मंदार दोंदे, विवेक पाटील, समृद्धी वाणी यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई ग्लोबल समिट चे आयोजन करण्यात आले होते. भारत आणि थायलंड यांच्यामध्ये द्विदेशीय व्यवसाय सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, फार्मसीटीकल्स, लाइफस्टाइल अँड हेल्थकेअर, बँकिंग, इन्शुरन्स, इंटरनॅशनल मीडिया, रिअल इस्टेट,हॉटेल अँड हॉस्पिटॅलिटी, टुरिझम अशा क्षेत्रातील तज्ञ मंडळींच्या पॅनल डिस्कशनचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध पत्रकार महेश म्हात्रे आणि टाइम्स ऑफ इंडियाचे असिस्टंट एडिटर चित्तरंजन टेंभेकर, सिटी बेल समूह संपादक मंदार दोंदे यांनी मॉडरेटर म्हणून या पॅनल डिस्कशन मध्ये उत्तमरित्या सुसंवाद घडवून आणला.
यू बिझनेस मिट यांच्या वतीने व्हर्च्युअल स्टुडिओ, मीटिंग रूम आणि एम ओ यू साईन करण्याकरता लीगल टीम देखील तैनात केली होती. अनेक उद्योजकांना या सुविधांचा लाभ झाला. बेलापूर येथील दि पार्क या तारांकित हॉटेलमध्ये सोमवार दिनांक 18 मे रोजी हे समिट संपन्न झाले.आमदार प्रशांत ठाकूर,निलेश म्हात्रे यांनी आवर्जून उपस्थित रहात नवी मुंबई ग्लोबल बिझनेस समिट या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.


थायलंड येथून PEITA सदस्य तथा माजी राजदूत थाराडोल थाँगग्रंग आणि पिटा सदस्य नरेन पियासच्चादेश हे उपस्थित होते तर इंजीनियरिंग इन्स्टिट्यूट ऑफ थायलंडचे संचालक तथा PEITA चे सल्लागार प्रो. डॉ. चियांचुंग ओदि कलायांनामित्र, थायलंड पंतप्रधान कार्यालयातील फॉरेन अफेयर्स सचिव प्रसर्त पियासाचादेश, वर्ल्ड पीस फाउंडेशनच्या संस्थापिका पी.ओरावान हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत होते.

एक्सपोर्ट इम्पोर्ट क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव असणारे ओमकार हरी माळी यांची चित्तरंजन टेंभेकर यांनी घेतलेली मुलाखत या समिटचे विशेष आकर्षण ठरली. तळोजा इंडस्ट्रियल इस्टेट चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांची रवींद्र प्रताप गुप्ता यांनी घेतलेली मुलाखत देखील लक्षवेधी ठरली. ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स चे संस्थापक डॉक्टर संजय भिडे, ह्यूमन केअर वर्ल्ड वाईड चे डी एस चक्रवर्ती, गोमाता विजन चे विकास कोळी, यू के एस रिसॉर्ट चे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संतोष पाटील, तेरणा हॉस्पिटलचे हेल्थकेअर ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट डॉक्टर मनीष राय, निवृत्त महासंचालक यशवंत ठाकरे, विभव इंटरनॅशनल कल्चरल अँड एज्युकेशनल फोरम चे दिलीप ठाणेकर,टेलेक्स चे जितेश पाटील आणि जयेश पाटील, प्लास्टिक सर्जन तथा कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ शंकर सावंत यांनी ग्लोबल समिट आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

यु बिझनेस मीट चे फाउंडर आणि एन्जॉय को वर्किंग स्पेस, वेब प्रिंट सोल्युशन्स या संस्थांचे संचालक असणारे वैभव सोनटक्के यांनी या समिटच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले. तर या ग्लोबल बिझनेस समिट चे आयोजनात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर समन्वय साधत अतुलनीय कामगिरी करणाऱ्या समृद्धी वाणी यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.