Press "Enter" to skip to content

वाढदिवसानिमित्त युवा नेते परेश ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

परेश ठाकूर यांनी वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे घेतले आशीर्वाद

पनवेल (प्रतिनिधी) हसतमुख स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि राजकारणापेक्षा समाजसेवेला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले भाजपचे युवा नेते, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज (दि. १८) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैद्यकीय, विधी, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून अभिष्टचिंतन झाले.  तत्पूर्वी परेश ठाकूर यांनी वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. 

अभिष्टचिंतन कार्यक्रमात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. 

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या परेश ठाकूर यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला तसेच उद्योजकता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दानशूर वृत्ती आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन हे परेश ठाकूर यांच्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले आहे. तरुणाईतील ऊर्जा समाजसेवेसाठी खर्च करत त्यांनी युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचे कार्य केले असून, तरुणांची मजबूत फळी उभी केली आहे. युवकांचे प्रश्न, सामाजिक जाण आणि संघटन कौशल्य यामुळे युवकांमध्ये त्यांच्याकडे आदर्श नेतृत्व म्हणून पाहिले जाते. युवकांना सामाजिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. युवा कार्यकर्त्यापासून पनवेल महापालिकेच्या सभागृहनेतेपदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय ठरला आहे. जबाबदारीची जाणीव ठेवून त्यांनी सभागृहनेते म्हणून अनेक विकासकामांना गती दिली. नगरसेवक, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कोशिश फाऊंडेशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आदी संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

      शैक्षणिक, मेळावे, आरोग्य शिबिरे, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे तसेच गरजूंसाठी विविध मदतकार्य अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी समाजाशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. पक्षबांधणीसह सामाजिक कार्यामध्ये त्यांनी केलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. साधेपणा, संयम, कार्यतत्परता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये मानली जातात. सामाजिक बांधिलकी आणि जनतेशी जोडलेली नाळ हेच त्यांच्या कार्याचे खरे बळ आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा देत अभिष्टचिंतन केले तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.  

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.