
गोविंदराव शिंदे यांनी केलेले कार्य हे अलौकिक आहे – विजय दिवाण
पनवेल – गोविंदराव शिंदे यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त पुरस्कार स्वीकारताना विजय दिवाण असे म्हणाले की गोविंदराव शिंदे यांनी सर्वोदयाचे कुष्ठरोग निवारण समिती शांतीवनचे तसेच ग्राम स्वराज्य समितीचे केलेले कार्य हे जनतेसाठी खूप मोलाचे आहे आदिवासींच्या जमीन प्रश्नावर तसेच मूलभूत प्रश्नांवर त्यांनी मोठे कार्य केले ग्रामदान आणि भूदान यावर त्यांचे कार्य हे अलौकिक असून त्यांच्या नावाचा पुरस्कार मला दिला जातोय हा माझ्या कामाचा गौरवच आहे
गोविंदराव शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी एका तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते त्यामध्ये सन्मानचिन्ह सन्मानपत्र व रुपये 11111/ – इतकी रक्कम पुरस्कार म्हणून दिली जाते यावर्षीचा हा पुरस्कार विनोबांचे जन्मगाव गागोदे तालुका पेन जिल्हा रायगड येथील कार्यकर्ते विजय दिवाण यांना देण्यात आला ते ग्रामदान भूदान तसेच सर्वोदयचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी प्रबोधनात्मक व कृतीत्मक कार्य सातत्याने करत आहेत
गोविंदराव शिंदे हे ग्राम स्वराज्य समिती महाराष्ट्रचे अध्यक्ष होते त्यांनी शहाद्यामध्ये तसेच पनवेल तालुक्यामध्ये आदिवासींची चळवळ उभी केली त्यांच्या जमीन प्रश्नावर व इतर हक्कांवर मोठे काम उभे केले त्यातून अनेकांना न्याय मिळवून देणे असे काम गोविंदराव शिंदे यांनी केले त्याचा आदर्श तरुणांनी घेतला पाहिजे असे मत या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते आबा कांबळे यांनी व्यक्त केले
या कार्यक्रमांमध्ये ॲड सुरेखा दळवी, धर्मेंद्र राजपूत, ॲड प्रमोद ठाकूर, अल्लाउद्दीन शेख, रिटघर चे ग्रामस्थ साईनाथ भोपी, शिवणसई चे ग्रामस्थ जयवंत पाटील, पत्रकार विजय सूर्यवंशी, माजी सरपंच रमेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकर व इतरांनी गोविंदराव शिंदे यांच्या बरोबरच्या कामाच्या आठवणी सभेत मांडल्या
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम स्वराज्य समितीचे अध्यक्ष शंकर बगाडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार संस्थेचे सचिव अल्लाउद्दीन शेख यांनी मांडले
या कार्यक्रमास प्रभाकर पाटील, चंदा कातकरी, राम गायकर, नितीन जोशी, साधना वैराळे विनायक शिंदे, चॅम्पियन बेंडले, मीनाताई पलांडे, सोपान बर्डे, शोभा बोलाडे, संतोष बोलाडे हे कार्यकर्ते उपस्थित होते




Be First to Comment