Press "Enter" to skip to content

नामदार भरत शेठ गोगावले यांनी नाईक कुटुंबीयांना दिलेला शब्द पाळला

पनवेल /वार्ताहर दि.१५

रोजगार हमी व फलोत्पादन आणि खार जमिनी विकास मंत्री सन्माननीय भरत शेठ गोगावले यांनी नाईक परिवाराला विवाह सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहतो असा शब्द दिला होता. तो दिलेला शब्द त्यांनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत पाळून नाईक कुटुंबीयांना सुखद धक्का दिला आहे.

पनवेल जवळील पारगाव कोहली गावात अजय नाईक यांचा विवाह प्रचिती हिच्यासोबत संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला नामदार भरत शेठ गोगावले यांनी आवर्जून उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. या विवाह सोहळ्यामध्ये नामदार भरत शेठ गोगावले यांचे शानदार पद्धतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी अहिल्या बाळाराम नाईक सरपंच तथा सदस्य रायगड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती दिशा अलिबाग रायगड, बाळाराम कृष्णा नाईक शिवसेना उरण संपर्कप्रमुख विधानसभा क्षेत्र उरण पंकज राम नाईक,अजय राम नाईक, पद्माकर कृष्णा नाईक, अनिल कृष्ण नाईक, लक्ष्मण केशव नाईक,विशाल श्याम नाईक, मुकेश श्याम नाईक, आकाश बाळाराम नाईक,स्वप्निल मोरे शिवसेना संघटक उरण, प्रकाश भोईर,कैलास भोईर, रोशन पाटील, निलेश गायकवाड उपसरपंच ओवळे हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.