Press "Enter" to skip to content

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात

मंडळ तुडील मधील नागरिकांनी घेतला विविध सेवांचा लाभ : नागरिकांनी मानले महसूल खात्याविषयी समाधान

पहिल्या टप्प्यातील 9वा आणि शेवटचा शिबीर उत्साहात संपन्न

महाड : रघुनाथ भागवत

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर मंडळ तुडील विभागामध्ये शुक्रवारी महाड तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल रावढळ येथे पार पडले. महाराजस्व समाधान शिबिराचा पहिल्या टप्प्यातील हा शेवटचा शिबीर होता. यावेळी तुडील मंडळातील नागरिकांनी शिबिरामध्ये देण्यात आलेल्या १५ विविध सेवांचा पुरेपूर लाभ घेऊन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सदर विशेष शिबिराचे उद्घाटन महाड तहसीलदार महेश शितोळे, महाड भुमिअभिलेख उपअधीक्षक भगत, तुडील मंडळ अधिकारी वनिता शिंदे, सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, पोलिस पाटील, सरपंच व शेतकरी बांधव उपस्थित होते. सुरुवातीला महाड तहसीलदार महेश शितोळे यांनी उपस्थित लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सेवांविषयी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत सर्व शासकीय यंत्रणा उपस्थित राहून त्यांनी त्यांच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांना दिला.

यावेळी देण्यात आलेल्या सेवांमध्ये महसूल विभागातील प्रलंबित फेरफार, ७/१२ उताऱ्यावरील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी ७/१२ उतारे, ८-अ उताऱ्याचे वाटप, उत्पन्न रहिवास जातीचे प्रमाणपत्र वाटप, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र वाटप, आकृतिक तरतुदी बद्दल मार्गदर्शन, सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसाह्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांचे दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, पांणद रस्त्याचा प्रशासकीय मान्यतेचा आदेश, घरासाठी पट्टे वाटप व ई-मोजणी अर्ज, ऍग्रीस्टॅक व पी.एम. किसान नोंदणी, कमी जास्त पत्रके भूसंपादन आकृषिक नोंदी मात्र दप्तर आद्यबाबत करणे या सेवांचा या शिबिरामध्ये समावेश होता.

तालुक्यात एकूण राबविण्यात आलेल्या या विशेष शिबिरांमध्ये ७ मार्च रोजी नाते मंडळ, १४ मार्च रोजी खरवली मंडळ, २५ मार्च रोजी गोंडाळे मंडळ, १० एप्रिल रोजी करंजाडी, १४ एप्रिल रोजी बिरवाडी, १७ एप्रिल रोजी शिरगाव, १ मे रोजी मांघरून, ८ मे रोजी महाड आणि पहिल्या टप्प्यातील शेवटचा 9 वा शिबीर शुक्रवार १५ मे रोजी तुडील मंडळ येथे पार पडले. यावेळी देखील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतकरी, महिला, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन जीवन सुकर करण्यासाठीचे महाअभियान राबविण्यात आले आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

सदर शिबिरामध्ये महसूल विभाग एकूण सातबारा वाटप – 74, 8-अ वाटप – 20, शिधापत्रिका वाटप – 27, शिधापत्रिकेमध्ये नवीन नाव वाढवणे/ कमी करणे – 15, अर्ज लाभ दिला. तर जन्म दाखले -13, जातीचे दाखले – 6, अधिवास दाखले – 13 तसेच अर्ज स्वीकारल्यामध्ये जातीचे दाखले अर्ज – 4, वय अधिवास अर्ज – 0, उत्पन्नाचे दाखले अर्ज – 37, वारस नोंद अर्ज – 14 स्वीकारले. तालुका भूमि अभिलेखद्वारे लाभार्थ्यांना ई-मोजणी प्रक्रियेची माहिती देण्यात आली. तसेच पोट हिस्सा मोजणी प्रक्रिये बाबत माहिती, बळीराजा पांणद रस्ते अभियानाबाबत माहिती, मोजणी व पोट हिस्सा बाबत माहिती तसेच स्वामित्व योजने बाबत यावेळी माहिती देण्यात आली. पुरवठा विभागद्वारे दुय्यम राशन कार्ड अर्ज – 17, शिधापत्रिकेतील नाव कमी 8 तसेच जनगणना 2027 बाबत माहिती देण्यात आली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.