Press "Enter" to skip to content

राज्यस्तरीय पायाभूत स्तर शिक्षण प्रशिक्षकांचे प्रशिक्षण कोकमठाण येथे संपन्न


रोहा,दि.१२(नंदकुमार मरवडे)

नवीन शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणी साठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये २ री, ३ री, ४ थी चा नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्याची शाळेत जून २०२६ पासून प्रत्यक्षात शिकवणे सुरु होणार आहे. त्या साठी राज्यातील इयत्ता २ री,३ री व ४ थी ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

या राज्यस्तरीय टप्पा आत्मा मलिक शैक्षणिक संकुल कोकमठाण कोपरगाव येथे दिनांक ८ ते ११ मे दरम्यान संपन्न करण्यात आले. या प्रशिक्षणतील रायगड जिल्यातील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पनवेल येथील अधिव्याक्यता कामशेट्टी व सौ. सुवर्णा तोरणे यांच्या नेतृत्वात रायगड जिल्यातील १३ तज्ञ् शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करणायत आली हैती.सदर तज्ञ् प्रशिक्षनार्थीकडून जिल्हस्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे..त्यानंतर सदर प्रशिक्षण तालुकास्तरावर प्रशिक्षण संपन्न होणार आहे.

या प्रशिक्षणासाठी तज्ञ् मार्गदर्शक म्हणून इयत्ता २ री साठी मराठी माध्यमासाठी उस्मान शेख, महेशकुमार जगताप, सीमा चव्हाण, माधवी बोरकर,सारिका पाटील तर उर्दू माध्यासाठी लियाकत राऊत, फाय्याज जोगीलकर, , शहानवाज लोरे तसेच इ ३री व ४ थी साठी मराठी माध्यमासाठी संजय पाटील, राजू वारे, गोविंद काकड, रुपाली पाटील,उषा खोपडे, सोनल गावंड, राकेश अहिरे हॆ तज्ञ् मार्गदर्शक म्हणून रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित होते. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीबीएसईच्या धर्तीवर व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणला अनुसरून असलेल्या या नवीन अभ्यासक्रमामुळे मराठी शाळेचा दर्जा, विद्यार्थी संख्या व गुणवत्ता वाढीसाठी फायदा होणार आहे.नवीन अभ्यासक्रमांतील बदल, नवीन संकल्पना व शैक्षणिक अनुभव हॆ राज्यातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रशिक्षणचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.