Press "Enter" to skip to content

जी.एन.एम नर्सिंग विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहात

तळोजा : प्रतिनिधी

तळोजा येथील बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जी.एन.एम नर्सिंगच्या पहिल्या वर्षाच्या मार्च २०२६ परीक्षेत यश संपादन केलेल्या टॉप ५ गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे माननीय अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील साहेब यांनी भूषविले.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सौरभ खेडेकर, उपप्राचार्या प्राची गाडे, वरिष्ठ ट्यूटर त्रिवेणी बुटकर तसेच कॉलेज समुपदेशक मिस रशना मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाला पहिल्या व दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

जी.एन.एम च्या पहिल्या बॅचमधील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा गौरव वाढविला. यामध्ये निमिषा चलाऊने हिने ७५.६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. कांचन देवडे (७४.८ टक्के) हिने द्वितीय, भक्ती साईल (७३.० टक्के) हिने तृतीय, बागुल पुष्पा (७०.८ टक्के) हिने चतुर्थ तर यादव आकांक्षा (६८.० टक्के) हिने पंचम क्रमांक पटकाविला.

यशस्वी विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील यांनी विद्यार्थिनींनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी करत समाजसेवेत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालय व्यवस्थापन व प्राध्यापकवर्गाने केले होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.