Press "Enter" to skip to content

महापौर नितीन पाटील उतरले “ग्राउंड झिरो” वर

“स्वच्छतेसाठी महापौर आपल्या प्रभागात” मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक १८ मध्ये विशेष स्वच्छता मोहिम

“स्वच्छतेसाठी महापौर आपल्या प्रभागात” या मोहिमेअंतर्गत आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

या मोहिमेद्वारे परिसर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, या भावनेतून सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यावेळी माझ्या सोबत सभागृह नेते अॅड. प्रकाशजी बिनेदार, भाजप पनवेल शहर अध्यक्ष नगरसेवक सुमितजी झुंजारराव, नगरसेविका प्रीती जॉर्ज (म्हात्रे), नगरसेविका स्नेहल ढमाले,भाजप पनवेल शहर सरचिटणीस रुपेशजी नागवेकर,भाजप प्रभाग क्रमांक 18 अध्यक्ष महेशजी सरदेसाई,भाजपा महिला शहर चिटणीस संजीवनी ताई खिल्लारे, भाजप जिल्हा पदाधिकारी, पनवेल शहर पदाधिकारी सुधीर देसाई, डॉ.विलास मोहकर, राजा चव्हाण, जॉनी जॉर्ज, सचिन नाझरे नरेंद्र सोनवणे, सुवर्णा सहजराव,जोस्त्ना माळी, तसेच पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.