Press "Enter" to skip to content

पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

वडाळे तलाव होणार जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त ; ‘जैविक नियंत्रण’ मोहिमेचा शुभारंभ

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल शहराचा ऐतिहासिक वारसा आणि भूषण असलेल्या वडाळे तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आज पनवेल महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘जैविक नियंत्रण’ मोहिमेचा शुभारंभ महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.

यावेळी तलावामध्ये वाढलेल्या ‘साल्व्हिनिया मोलेस्टा’ या आक्रमक जलपर्णीच्या निर्मूलनासाठी ‘साल्व्हिनिया विविल’ या जैविक कीटकांचे विसर्जन करण्यात आले. अत्यंत कमी खर्चात आणि पर्यावरणपूरक पद्धतीने राबविण्यात येणारी ही मोहीम वडाळे तलावाला पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि जलपर्णीमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

या उपक्रमामुळे जलपर्णी काढण्यासाठी होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाला आळा बसणार असून, शाश्वत उपाययोजनेद्वारे तलाव संवर्धनाचा आदर्श निर्माण होणार आहे. मध्य प्रदेशातील सारणी, जबलपूर येथील गिदुराहा व मुरवारी तलावांमध्ये या तंत्रज्ञानाला यश मिळाले असून, त्याच धर्तीवर वडाळे तलावालाही नवसंजीवनी मिळणार आहे.

या कार्यक्रमास माझ्यासोबत सभागृह नेते श्री. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती श्री. बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती सौ. ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेते श्री. अरविंद म्हात्रे, नगरसेवक-नगरसेविका, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, समाजसेविका सौ. ज्योती नाडकर्णी, सौ. रंजना सडोलीकर, आसीएआर संस्थेच्या संशोधिका डॉ. अर्चना अनोखे तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.