
करंजाडे येथील नवीन स्मशानभूमींच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर ; भाजप नेते माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांचा पाठपुरावा
पनवेल/प्रतिनिधी — करंजाडे वसाहतीत एकच स्मशानभूमीमुळे नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी इतर ठिकाणी जावे लागत होते. याबाबत नवीन स्मशानभूमी बांधावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यानुसार आ. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडकोकडे पाठपुरावा करून सिडकोकडून नवीन बांधकाम सुरु असून त्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे.
सिडकोने करंजाडे वसाहतीची निर्मिती केली. मात्र सिडकोकडून सुविधासाठी अजूनही पाठपुरावा करावा लागतं आहे. करंजाडे वसाहतीमध्ये दोन सरण रॅक असलेली स्मशान आहे. मात्र वसाहतीत वाढती लोकसंख्या आणि जुन्या स्मशानभूमींची अपुरी क्षमता यामुळे नवीन स्मशानभूमीची मागणी जोर धरत आहे. त्याचबरोबर अंत्यसंसकारासाठी नातेवाईकांना कामोठे किंवा पनवेल महापालिका हद्दीत जावे लागत असल्याने गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडकोकडे वारंवार पत्रव्यवहारसह अखंड पाठपुरावा केला होता. अखेर सिडकोकडून नवीन स्मशानभूमीचे बांधकाम आणि अस्तित्वातील स्मशानभूमीची दुरुस्ती करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही.
स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारावर, अंतर्गत रस्त्यांवर पुरेसे पथदिवे बसवा..
स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि अंतर्गत रस्त्यांवर पुरेसे पथदिवे, हाय-मास्ट दिव्यांची उभारणी करावी तसेच अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणि वेटिंग हॉलमध्ये आवश्यक विद्युत उपकरणे व योग्य प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी भाजप नेते माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडकोकडे पत्रद्वारे केली आहे.




Be First to Comment