Press "Enter" to skip to content

जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे एस.एस.सी चा निकाल शंभर टक्के


आवरे प्रतिनिधी (सचिन पाटील) “विद्वान सर्वत्र पूज्यते “राज्या त्याच्या राजवाड्यात, धनवान धनिक लोकांत परंतु विद्वानांचा आदर हा सर्वत्र केला जातो यशस्वी निकालाची परंपरा असलेले आवरे गावातील म्हणजेच स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांच्या स्वप्नातील विद्यालय जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे होय विद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजतागायत विद्यालयाचा निकाल हा शत प्रतिशत असतो हीच परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल हा यावर्षी ही शंभर टक्के लागला विद्यार्थिनी केलेली मेहनत हिला खरंच यश मिळालं आहे.

समान गुण असल्याने दोन विद्यार्थ्यांनीनि प्रथम येण्याचा संयुक्त असा बहुमान प्राप्त केला आहे कुमारी दिक्षा उदय म्हात्रे (82.20%)तसेच कुमारी श्रुती ऋषिकेश म्हात्रे (82.20%)अनुक्रमे प्रथम आहेत .
द्वितीय क्रमांक कुमारी कार्तिकी भारत पाटील(.80.40%)व तृतीय क्रमांक कुमारी भक्ती आयोध्या म्हात्रे (78.00%) तसेच सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत सुयश प्राप्त केले आहे .

या वर्षी परीक्षेसाठी एकूण 23 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे सर्व विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहेत आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर संस्थेचे खजिनदार श्री वामन ठाकूर सर विश्वस्त सौ अलका ठाकूर मॅडम विश्वस्त सिंधू ठाकूर मॅडम विश्वस्त आदिनाथ ठाकूर सर विश्वस्त प्रसाद ठाकूर सर विश्वस्त सौ रीना ठाकूर मॅडम विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे मॅडम विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे या वर्षीचा निकाल जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष स्वर्गीय अशोक ठाकूर सर यांना अर्पण केला आहे अशा प्रकारे
जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे एस.एस.सी चा निकाल शंभर टक्के

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.