
पनवेल दि. ८ ( संजय कदम ) : पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे हद्दीतील महिला दक्षता समिती सदस्य यांची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला वपोनि गजानन घाडगे व पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र म्हात्रे यांनी विशेष मार्गदर्शक तसेच सूचना केल्या त्यामध्ये महिला/ मुली यांची सुरक्षा यावर चर्चा/ मार्गदर्शन केले. सायबर क्राईम, नशा मुक्ती चर्चा / मार्गदर्शन व सदर बाबत माहिती मिळाल्यास डायल 112 सकाळ संपर्क करणे. शाळा /कॉलेज येथे विद्यार्थीनी यांचे सुरक्षेच्या दृष्टीने महिला वार्डन नेमणे बाबत. उपस्थित शिक्षिका- महिला दक्षता सदस्य यांना सूचना केली आहे. महिला सक्षमीकरण, महिलांचे अडीअडचणी , तक्रारी या करिता पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांची माहिती देण्यात आलेली आहे. महिला दक्षता समिती सदस्य यांच्या अडीअडचणी ऐकून त्यांच्या समस्येचे निराकरण करण्यात आलेले आहे . सदर बैठकीत महिला दक्षता समिती सदस्य व प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या.



Be First to Comment