Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धेत भूमी म्हात्रे हिची निवड

आवरे प्रतिनिधी (सचिन पाटील)

गोवठणे गावची सुकन्या सुकन्या भूमी आनंद म्हात्रे हिची रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धेत आदीप्रचितीत ट्रॅव्हल्स तुरुंबवाडी म्हसळा या संघात निवड झाली आहे.

भूमी आनंद म्हात्रे ही जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरेची विद्यार्थिनी आहे. लहानपणापासून स्पर्धेची आवड असणारी भूमी ही शालेय स्तरावर तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व करत असत व कबड्डीत विशेष नावलौकिक मिळवलेला आहे. भूमी ही मार्शल आर्ट्स चे धडे सुद्धा जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे विद्यालयातील क्रीडा शिक्षक शुभम ठाकुर सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे.

रायगड जिल्हा महिला कबड्डी या स्पर्धेत निवड झाल्याबद्दल भूमी चे आई-वडील नातलग परिवार तसेच आत्माराम ठाकूर मिशन संस्थेचे अध्यक्ष प्रतिक ठाकूर सर जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे च्या मुख्याध्यापिका सौ निकिता म्हात्रे व्यवस्थापन कमिटीचे सदस्य शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी व भूमीचा मित्रपरिवार या सर्वांनी सदर निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी सुद्धा भूमीला शुभेच्छा दिलेल्या आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.