Press "Enter" to skip to content

आवरे येथे रामचंद्र म्हात्रे विद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा संपन्न


प्रतिनिधी( हिमांशू पटेल)

आयुष्यात यशस्वी तोच होतो जो आपल्या उत्तम कर्मासोबत मेहनतीला प्राधान्य देतो शैक्षणिक जीवनात विद्यार्थी सुद्धा आपली चमक ही अभ्यासासोबत इतर कलागुणांना विशेष महत्व देऊन त्यात यशस्वी होतात अश्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवरे- उरण, दि. 24 एप्रिल 2026*: रामचंद्र म्हात्रे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी उरण पंचायत समितीच्या सदस्या सौ. प्रारंभी गावंड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासमवेत आवरे ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच श्रीमती निराबाई पाटील, गोवठणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. प्रणिता म्हात्रे, निसर्गप्रेमी नागेंद्र म्हात्रे, पोलीस पाटील विजय म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संदिप गावंड, निवृत्त वाहतूक निरीक्षक रमाकांत म्हात्रे, पालक प्रतिनिधी मेनन म्हात्रे, योजना म्हात्रे, निवृत्त शिक्षिका शकुंतला पाटील, शोभा वायकोळे, निवृत्त शिक्षक शरद केणी आदी मान्यवर उपस्थित होते.

2025-26 या शैक्षणिक वर्षात कला, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्या सौ. प्रारंभी गावंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. सरपंच प्रणिता म्हात्रे, नागेंद्र म्हात्रे, संदीप गावंड, मुख्याध्यापक सुभाष ठाकूर यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी गोरे यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत निवास गावंड व विद्याधर गावंड यांनी केले. मान्यवरांचे आभार प्रवीण चिर्लेकर यांनी मानले. या वेळी संगीता म्हात्रे, प्राजक्ता महाले, शेखर म्हात्रे, सुनील जानकर, विलास काटे तसेच विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.