
पनवेल , दि. १७ ( वार्ताहर ) : कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेच्या एलिट पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्डचा निकाल उल्लेखनीय लागला आहे .
कमल गौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे एलिट पब्लिक स्कूल सीबीएसई बोर्डचा लागला असून प्रथम अनुष्का महालिंग गस्तगार ९५.००%, द्वितीय श्रेया राहुल भरसाकले ९३.२०%, तृतीय माही नितेश गायकवाड ९२.००% चौथा अभिनव सूर्यदेव यादव ९०.२०% पाचवा अनुज प्रमोद कुशवाहा ९०.००% असा लागला आहे . या बद्दल संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना तुमची उपलब्धी शाळेला अभिमान मिळवून देते आणि भावी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असल्याचे सांगितले.




Be First to Comment