Press "Enter" to skip to content

सूरज कान्हेकर याची ठाणे पोलीसपदी निवडकठिण परिस्थितीत मिळविले सुयश


सर्वच स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

खांब,दि.१५(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील देवकान्हे गावचा सुपुत्र सूरज शरद कान्हेकर याची नुकतीच ठाणे पोलीसपदी निवड करण्यात आली आहे.सूरज कान्हेकर याच्या या निवडीमुळे कान्हेकर कुटुंबाचे नाव उंचावले आहे.

कुटुंबाची परिस्थिती अतिशय नाजूक असताना देखील सूरजने आपली जिद्द आणि चिकाटी सोडली नव्हती. त्याने पोलीस होण्याचे स्वप्न त्याने पुर्ण करून दाखवले आहे.सुरज कान्हेकर पोलीस झाल्याने समस्त कान्हेकर परिवारातून आनंद व्यक्त करून देवकान्हे गावातून त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी उद्योजक नारायण कान्हेकर, सूरजचे वडील शरद कान्हेकर, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कान्हेकर,तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश कान्हेकर, निलीमा कान्हेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान त्याच्या या निवडीबद्दल समाजातील सर्वच स्तरातून त्याचे अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.