Press "Enter" to skip to content

रायगडात अनाधिकृत दारू गुत्यामुळे वाहनांच्या अपघातात लक्षणीय वाढ


पनवेल दि. ११ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी चक्क मुंबई गोवा हायवेवर राञी अपराञी अनाधिकृत दारू विक्री केंद्र फोफावल्याने या मार्गावर वाहनांच्या अपघातात लक्षणीय वाढ होऊन निष्पाप नागरीकांचे जीव जात असल्याचे समोर येत आहे.

नुकताच राञी तीनच्या सुमारास नागोठणे जवळील सुखेळी खींडीत झालेल्या भीषण अपघातात 2 निष्पाप नागरीकांचा जीव जाऊन सुमारे 38 जण गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे या ट्रॅव्हल्स बसचा चालकाने मद्य प्राशन केले असल्याने प्रवाशांना संशय आल्याने तो सदर ट्रॅव्हल्स बस विचीञरीत्या चालवत असल्याचे जाणवल्याने बसचा चालक तात्काळ बदली करून मिळावा अशी मागणी बस मधील प्रवाशांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडे केल्याचे समजते परंतु सदर मद्य प्राशन केलेला त्या बसचा चालक हा ऐकण्याच्या स्थीतीत नव्हता ट्रॅव्हल्स कंपनीने देखील पर्यायी बदली चालक देण्यास बगल दिल्याने नागोठणे येथे जेवण आटोपुन सदर चालक पुन्हा स्टेरींगवर बसला व थोड्या फर्लांगवर जात नाही तर चालक मद्यधुंद असल्याने सदर ट्रॅव्हल्स बस सुकेळी खींडींत राञी पलटी होऊन दोन मृत्युमुखी होऊन सुमारे 38 प्रवासी गंभीर जखमी झाले.

हायवेवर ठिक ठिकाणी अनाधिकृत राञी देखील मद्य खुले विक्री होत असल्याने मुंबई गोवा महामार्गावर अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे या गंभीर बाबीकडे रायगड राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक यांचे जाणीवपुर्वक डोळेझाक करीत असल्याने अशा निष्क्रीय रायगड राज्य उत्पादन शुक्ल अधिक्षकांची त्वरीत बदली करण्यात यावी अशी सुज्ञ रायगडवासीयांची मागणी आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.