Press "Enter" to skip to content

सुप्रसिद्ध किर्तनकार कबीर महाराज अत्तार यांची शिरवली येथे हरि किर्तनरुपी सेवा


खांब,दि.११(नंदकुमार मरवडे)

रोहा तालुक्यातील शिरवली या गावामध्ये सालाबादप्रमाणे या ही वर्षी सोम.दि.१३ एप्रिल रोजी येथील पोटफोडे परिवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील सुप्रसिद्ध किर्तनकार व समाजप्रबोधनकार झी टॉकीज मन मंदिर फेम व राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हभप कबीर महाराज अत्तार यांच्या हरि किर्तनरूपी सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी श्री.सत्यनारायणाची महापूजा,सायं.६ ते ७:३० खांब पंचक्रोशीतील भाविक भक्त यांच्यासह किल्ला,वरसगाव,महादेववाडी,पाले,वांगणी व शिरवली ग्रामस्थ यांची हरिपाठ सेवा,७:३० ते ८:३० महाप्रसाद तर रात्रौ.९ ते ११ हभप कबीर महाराज अत्तार यांची हरिकिर्तनरूपी सेवा आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.तर संपुर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पोटफोडे परिवार व शिरवली ग्रामस्थ मोलाचे सहकार्य सहकार्य करीत आहेत.

पोटफोडे परिवारातील विद्यमान सरपंच महेंद्र पोटफोडे हे दरवर्षी आपल्या परिवाराचे कुलदैवताचे वार्षिक कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील नामवंत किर्तनकार यांच्या किर्तनांचे आयोजन करून भाविकांना चांगल्या प्रकारे उत्तम श्रावणाचा व सामाजिक प्रबोधनाचा लाभ मिळवून देत आहेत.

दरम्यान हभप कबीर महाराज अत्तार झी टॉकीजवरील मन मंदिरा फेम असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार, राष्ट्रीय स्तरावरील शिवशंभू व्याख्याते आणि वारकरी संप्रदायातील एक मान्यवर व्यक्तिमत्व आहेत.तसेच त्यांच्या कीर्तनांमुळे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे अनेक भक्तांना प्रेरणा मिळाली आहे.कबीर महाराज अत्तार यांनी महाराष्ट्रभर कीर्तनांच्या माध्यमातून भक्ती, नैतिकता आणि समाजप्रबोधन यांचा प्रसार केला आहे. त्यांच्या कीर्तनांमध्ये संतांच्या अभंगांचे सुंदर निरूपण,जीवनातील मूल्यांवर भर,समाजातील वाईट प्रवृत्तीवर भाष्य हे विशेष आहे.ते ‌विशेषतः संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांसारख्या संतांच्या विचारांचा प्रसार करतात.त्यांच्या कीर्तनाची शैली म्हणजे रसाळ आणि प्रभावी वाणी,साधी सोपी उदाहरणे व कथा वापरून समजावणे आणि श्रोत्यांशी थेट संवाद साधणे अशी आहे.त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. ग्रामीण भागात त्यांना विशेष मान आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.