Press "Enter" to skip to content

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शौचालयाचे उद्घाटन

पनवेल प्रतिनिधी

पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन संचालक मंडळ कार्यान्वित झाल्यावर त्यांनी बाजार आवारामध्ये शौचालय संकुल बांधण्याचा संकल्प केला होता. शेकाप नेते आणि पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक मा. आमदार बाळाराम पाटील यांच्या शुभहस्ते शौचालय संकुल इमारतीचे गुरुवार दिनांक ९ एप्रिल रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सभापती नारायण शेठ घरत,भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्य सहचिटणीस भाई मोहन गुंड आणि मराठवाड्यातील शेतकरी नेते एड. निखिल बचुटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाचे सभापती नारायण शेठ घरत यांनी हाती सुत्रे घेतल्यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावण्याचा धडाका घेतला आहे. याच प्रयत्नात बाजार आवारामध्ये येणाऱ्या ग्राहक, व्यापारी, हमाल,मापारी माता-भगिनींना मल मूत्र विसर्जनासाठी होणारी गैरसोय टाळण्याचे उदात्त हेतूने सार्वजनिक शौचालय संकुल उभारण्याचे काम हाती घेतले.
तूर्तास कार्यरत असणारे संचालक मंडळ २०२८ पर्यंत कार्यरत राहणार आहे. सार्वजनिक शौचालय संकुल उद्घाटन सोहळ्याला सभापती नारायण शेठ घरत उपसभापती सुनील सोनावळे, सचिव प्रकाश दत्तात्रय नाईक, संचालक भाई सुभाष पाटील, अशोक गायकर, बाळकृष्ण पाटील, प्रताप हातमोडे, रामचंद्र पाटील, सखाराम पाटील, अर्जुन गायकर,ललिता फडके, महादू पाटील, देवेंद्र मढवी, देवेंद्र पाटील,मच्छिंद्रनाथ पाटील,सोमनाथ म्हात्रे, दिनेश महाडिक,आतिश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.