Press "Enter" to skip to content

रायगड जिल्हा बास्केटबॉल निवड चाचणीचे आयोजन


खांदा कॉलनी : बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड यांच्या वतीने 13 वर्षाखालील गटातील मुले व मुली यांच्यासाठी रायगड जिल्हा निवड चाचणीचे आयोजन रविवार 12 एप्रिल ला 2026 सकाळी 7.00 वाजता महात्मा स्कूल सेक्टर 8 खांदा कॉलनी येथे करण्यात येत आहे.
या निवड चाचणीतून निवडलेला संघ
13 वर्षाखालील गटातील महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.

रायगड जिल्ह्यातील सर्व बास्केटबॉल खेळाडूंना या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खेळाडूंनी निवड चाचणीसाठी येताना दोन पासपोर्ट आकाराचे फोटो , वयाचा पुरावा आणि निवासाचा पुरावा (आधार कार्ड किंवा समकक्ष कागदपत्र) सोबत आणणे बंधनकारक आहे.

“रायगड जिल्ह्यातील सर्व बास्केटबॉल खेळाडूंसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड तर्फे खांदा कॉलनी येथे 13 वर्षाखालील गटातील मुला-मुलींसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवून राज्यस्तरावर प्रगती करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सर्व तरुण खेळाडूंनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे,” असे आवाहन आमदार विक्रांत दादा पाटील उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना
अध्यक्ष, बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी खेळाडूंनी आशिष पाटणे (+91 9029596880), मंदार म्हात्रे (+91 88508 00299) व आकाश चाकणे (संपर्क: ९०२९५९६९४९) यांच्याशी संपर्क साधावा.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.