
पनवेल दि.०९(वार्ताहर): शिवसेना मध्ये जोरदार इनकमिंग सुरु असून उलवेमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे.
नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशे हस्ते उरण मतदार संघातील उलवे मधील अमर म्हात्रे, संकल्प घरत यांच्यासह अनेक शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मंत्री भरतशेठ गोगावले, उरण जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Be First to Comment