
अंत्यविधी शुल्कातील भेदभावावर महाविकास आघाडीचे नगरसेवक लतीफ शेख यांनी केला संताप व्यक्त
पनवेल दि.०८(वार्ताहर): पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत अंत्यविधी शुल्काच्या मुद्यावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी अंत्यविधी खर्च सुमारे २ हजार ५०० रुपये, तर बाहेरील नागरिकांसाठी तब्बल ४ हजार १०० रुपये आकारले जात असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित झाला. अंत्यविधी करता पालिका आणि मंडळ हे. कार्यरत असंतात. असे असतानाही या दरातील तफावत म्हणजेच भेदभाव असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नगरसेवक लतीफ शेख यांनी केला आहे.
पालिका सेवा देत आहे की व्यवसाय करत आहे? असा थेट सवाल देखील त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. दरम्यान, अंत्यविधीसारख्या संवेदनशील सेवेतही आर्थिक फरक का केला जातो, याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली. मृत्यूनंतरही नागरिकांना आर्थिक अडचणींचा साम ना करावा लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. जीवनभर उपचारांवर लाखो रुपये खर्च करूनही शेवटच्या विधीसाठी पैसे मोजावे लागणे ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबई पालिकेत अंत्यविधी मोफत केला जात असल्याचे ऐकण्यात आले आहे, पनवेलमध्येही अशीच योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली.


Be First to Comment