Press "Enter" to skip to content

गुणवंत विद्यार्थी पुरस्कारप्राप्त आस्था थिटे हिचा विशेष सन्मान


खांब,दि.९(नंदकुमार मरवडे)

रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावची सुकन्या
आस्था विनोद थिटे हिला प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय आदर्श गुणवंत विद्यार्थी पुरस्काराबद्दल गावाच्या वतीने संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला आहे.

आस्था थिटे हिला अलिकडेच अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्या वतीने आळंदी येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तिच्या या सुयशाबद्दल बाहे गावातील गावदेवी बाहे मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने संपन्न करण्यात आलेल्या विभागीय कबड्डी स्पर्धेत तिचा विद्यमान जि.प.सदस्या निधी जाधव यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला आहे.

यावेळी गोवे ग्रा.पं.माजी सरपंच नरेंद्र जाधव,ओबिसी समन्वय तालुकाध्यक्ष अनंत थिटे, शाहीर अनंत मगर, उद्योजक नारायण कान्हेकर,पत्रकार श्याम लोखंडे,पो.पाटील मनोज थिटे,गाव कमिटी अध्यक्ष सुभाष माटल,माजी उपसरपंच गणेश पवार,सदस्य रविंद्र राऊत,उपक्रमशिल शिक्षक सुनील थिटे,रूपेश बामुगडे,युवा समाजसेवक संदेश गायकवाड,हभप काशिनाथ थिटे,संजय जाधव,सचिन देवकर,जगदीश थिटे,संतोष थिटे,राकेश देवकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.