Press "Enter" to skip to content

स्पर्धा पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणार

भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत “राज्यस्तरीय मोदक विशेष स्पर्धा” आयोजन

मुंबई (पंकजकुमार पाटील ): मुंबईतील भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्थेकडून ‘अन्नपूर्णा स्वादिष्ट’ उपक्रमा अंतर्गत ‘राज्यस्तरीय मोदक स्पर्धा विशेष’ आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. हि स्पर्धा पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात होणार असून, राज्यातील कोणत्याही कोपऱ्यातून गृहिणी, आचारी आणि पाककला प्रेमींना यात सहभागी होता येणार आहे. सदर स्पर्धेमध्ये मोदक बनवण्याची पद्धत (Traditional & Innovative). आकर्षक सजावट (Modak Presentation). पाककृतीची माहिती (Ingredients & Recipe). स्वच्छता आणि सात्विकता (Purity and Divinity)या प्रमुख निकषांवर गुण दिले जातील.

हि स्पर्धा पूर्णतः मोफत असून यात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मोदकाचा एक सुंदर फोटो काढावा. त्यासोबत मोदकाची सविस्तर कृती (Recipe) आणि स्वतःची माहिती लिहावी. हि सर्व माहिती संस्थेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा. स्पर्धेसाठी अंतिम तारीखः १५ एप्रिल असून निकाल १८ एप्रिल रोजी सकाळी ९:०० वाजता जाहीर होईल.
यशस्वी स्पर्धकांना संस्थेमार्फत अधिकृत डिजिटल प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच, काही विशेष निवडक सदस्यांना दादर येथील संस्थेच्या प्रशालेत आयोजित मुख्य कार्यक्रमात विशेष अतिथींच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.अधिक माहितीः संपर्क ९९६८५1३६०९/ ९३२३०६८८७३ संकेतस्थळ: bharatiyavedic.org

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.