Press "Enter" to skip to content

रोह्याचा कबड्डी स्टार – राज मोरेची दमदार छाप

७३ व्या राज्यस्तरीय निवड चाचणी व अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत रायगडने पटकावले तृतीय क्रमांक

रोहा ,दि.७(नंदकुमार मरवडे)

नाशिक येथे पार पडलेल्या ७३ व्या वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत रा.जि.संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावले आहे. या यशामध्ये संघातील सर्वच खेळाडूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून संपूर्ण स्पर्धेत प्रशिक्षकांची भूमिका देखील निर्णायक ठरली.

या स्पर्धेत जय बजरंग रोहा कबड्डी संघाचा अष्टपैलू खेळाडू राज ज्ञानेश्वर मोरे याचे विशेष योगदान राहिले. राज मोरे याने संपूर्ण स्पर्धेत मजबूत डिफेन्स, चपळ हालचाली आणि निर्णायक क्षणी केलेले सुपर टॅकल यांच्या जोरावर संघाला महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आघाडी मिळवून दिली. त्याच्या सातत्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे तो संघातील प्रमुख खेळाडू म्हणून ठरला.राज मोरे याची कबड्डीतील वाटचाल सातत्यपूर्ण यशाने भरलेली आहे. २०२० मध्ये किशोर गटात जय बजरंग रोहा संघाला जिल्हा निवड चाचणीत विजेता बनवण्यात त्याचा मोठा वाटा होता. त्यानंतर कुमार गटात कर्णधार म्हणून दोन वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिले, ज्यामुळे त्याचे नेतृत्वगुण अधोरेखित झाले.त्याच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत २०२५ मध्ये रायगड जिल्हा कुमार गट संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. तसेच पुढे त्याने महाराष्ट्र कुमार गट संघात स्थान मिळवत राज्य पातळीवर आपली ओळख निर्माण केली.यासोबतच युवा कबड्डी लीगसाठीही रायगड संघात स्थान मिळवत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली, ज्यामुळे त्याची गुणवत्ता अधिक अधोरेखित झाली आहे.

राज मोरे याच्या या यशामुळे जय बजरंग रोहा संघ व रोहा तालुक्याचा क्रीडा अभिमान अधिक उंचावला आहे. राज मोरे व संघाच्या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.