
खांब,दि.६(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील नवसाला पावणारी देवी म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात ख्याती असलेल्या मुठवली खुर्द येथील ग्रामस्थांचे श्रद्धेचे व विश्वासाचे प्रतिक असणाऱ्या श्री.रत्नाई देवी मंदिर वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन शुक्र.दि.१० एप्रिल रोजी करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
स्वा.सु.गुरूवर्य अलिबागकर बाबा यांच्या आशीर्वादाने व स्वा.सु.गुरूवर्य गोपाळ बाबा वाजे व धोंडूबाबा कोलाटकर यांच्या कृपाछत्राखाली तसेच हभप गुरूवर्य नारायण महाराज वाजे पंढरपूर,हभप स्वा.सु.नि.गुरूमाऊली सखाराम महाराज निकम व हभप गुरूवर्य ब्रह्मलीन पुरूषोत्तम महाराज पाटील यांच्या कृपाशीर्वादाने संपन्न होणाऱ्या या वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी पहाटे ४ ते ६ काकड आरती व भूपाळी,८ ते ९ ध्वजारोहण व कळशपूजन,९ ते १२ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण तद्नंतर सामाजिक कार्यकर्ते मारूती गणपत तुपकर यांच्या सौजन्याने महाप्रसाद तर दु.२ ते ४ श्री.सत्यनारायणाची महापूजा,सायं.४:३० ते ५:३० कु.प्राची राम सावंत यांची प्रवचन सेवा,सायं.५ वा.मुठवली ग्रामस्थ,धामणसई पंचक्रोशी व कोंकण दिंडी रोहा यांचे सामुदायिक हरिपाठ तद्नंतर सायं.७ वा.झी टाॅकिज फेम सुप्रसिद्ध किर्तनकार अश्विनीताई भोईर यांची हरिकिर्तनरूपी सेवा, तद्नंतर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अनंत देशमुख पिंगळसई यांच्या सौजन्याने महाप्रसाद आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात येणार आहेत.
या संपुर्ण सोहळ्याचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ मुठवली,तरूण मंडळ व हरिपाठ मंडळ मुठवली मोलाचे सहकार्य करीत आहेत.



Be First to Comment