Press "Enter" to skip to content

सीकेटी महाविद्यालयात ‘रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न!

टाटा, व्हीनस सेफ्टी अँड हेल्थ, एचडीएफसी आणि आरपीजी लाईफसायन्सेस यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा सहभाग

पनवेल: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर कला,वाणिज्य आणि विज्ञान (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्याप्लेसमेंट सेलतर्फे गुरुवार, दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी आयोजितकरण्यात आलेला भव्य ‘रोजगार मेळावा’ अत्यंत उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील पदवी व पदव्युत्तरविद्यार्थ्यांसह महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभागनोंदवला असून, एकूण २४८ विद्यार्थ्यांनी या मेळाव्यासाठी आपलीनावनोंदणी केली होती.

या वर्षीच्या रोजगार मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बँकिंग, आयटी, फार्मा, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि एज्युकेशन अशा विविध क्षेत्रांतीलनामांकित एकूण ३४ कंपन्या सहभागी झाल्या होत्या.

यामध्ये नोमुरा (Nomura), टाटा आयआयएस (Tata IIS), एचडीएफसीबँक (HDFC Bank), कोटक बँक – मणीपाल (Kotak Bank), आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड (RPG Life Sciences Ltd), एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस (HDB Financial Services), व्हीनससेफ्टी अँड हेल्थ (Venus Safety & Health), आणि महिंद्रा इंटिग्रेटेडबिझनेस सोल्यूशन्स (Mahindra Integrated Business Solutions) यांसारख्या जागतिक स्तरावरील नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्यामुलाखती घेतल्या.

सीकेटी महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळआत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले नाही, तर त्यांच्या व्यावसायिकस्वप्नांना एक नवी दिशा मिळाली आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्णकरत असतानाच अशा जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध झाल्यामुळेविद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील आणिआय.क्यू.ए.सी. (IQAC) समन्वयक प्रो. (डॉ.) बी. डी. आघाव यांच्यामार्गदर्शनाखाली प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष प्रो. सत्यजित कांबळे यांनी सूक्ष्मनियोजन केले होते. याकामी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी श्रीमतीआरती कागवाडे, प्लेसमेंट समन्वयक श्रीमती श्रुती कोळी आणि प्लेसमेंटसेल कमिटीच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून हा मेळावा यशस्वीकेला.

या यशस्वी आयोजनाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्षमाजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, अध्यक्ष श्री. अरुणशेठ भगत,उपाध्यक्ष श्री. वाय. टी. देशमुख, पनवेलचे आमदार श्री. प्रशांत ठाकूर वसंस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केलेआहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.