
देहरादून उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वॅान्डो पंच सेमिनार व पंच परीक्षेसाठी सुभाष पाटील यांची परीक्षक म्हणून नियुक्ती
पनवेल ( प्रतिनिधी ).
तायक्वॅान्डो फेडरेशन ऑफ इंडिया व तायक्वॅान्डो असोसिएशन ऑफ उत्तराखंड या अधिकृत संघटने मार्फत देहरादून येथे १०ते १२ एप्रिल २०२६ राष्ट्रीय पंच सेमिनार व राष्ट्रीय पंच परीक्षा होणार आहे या होणा-या तायक्वांदो परीक्षा साठी परीक्षक म्हणुन रायगड चे सुपूत्र तायक्वांदो आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तसेच कॉमनवेल्थ तायक्वांदो रेफरी युनियनचे सदस्य सुभाष पाटील यांची निवड झाली आहे.
सुभाष पाटील हे ७ वी डिग्री ब्लॅक बेल्ट व आंतरराष्ट्रीय पंच आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पंच म्हणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी अनेक देशात जाऊन सेनिनार केले आहेत नविन नियम २०२६ चे सुभाष पाटील यांनी इस्वातीनी साऊथ अफ्रीका नियमावली शिक्षण घेऊन भारतात त्याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी अनेक राज्या मध्ये जाऊन ते सेमिनार घेत आहेत ते प्रथम श्रेणीचे आंतरराष्ट्रीय पंच आहेत आंतरराष्ट्रीय ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा दक्षिण कोरिया २००४ भारतीय संघाचे कोच, पंच पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा २०१० भारत, पंच कॉमनवेल्थ स्पर्धा २०११ आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा दक्षिण कोरिया २०११ भारतीय संघाचे कोच, पंच ११ वी इजराइल ओपन तायक्वांदो स्पर्धा २०१३ पंच ८ वी स्कॉटिश ओपन स्पर्धा २०१३ स्कॉटलंड, संघप्रमख कोरिया ओपन २०१४, आरतराष्ट्रीय साफ गेम २०१६, लुसोफोतीया तायक्वांदो स्पर्धा नियंत्रक २०१४ गोवा, कॅनडा ओपन व पैरा ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिप २०१७ पंच २०२३ वर्ल्ड तायक्वांदो प्रेसिडंट कप व ओशियाना पॅरा व ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा तसेच आतापर्यंत अनेक स्पर्धा परिक्षा मध्ये सहभागी होऊन सुभाष पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
गोवा नॅशनल गेम २०२३ व नॅशनल गेम उत्तराखंड २०२५ स्पर्धेसाठी सुभाष पाटील यांची पंच प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती ते ९ एप्रिल २०२६ रोजी देहरादून उत्तराखंड येथे रवाना होणार आहेत. त्यांना या स्पर्धेसाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) ) , रायगड तायक्वांदो असोसिएशन चे सर्व पदाधिकारी आमदार प्रशांत ठाकुर, आमदार विक्रांत पाटील माजी सभागृह नेते परेश ठाकुर महापौर नितीन पाटील व इतर मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.



Be First to Comment