
खांब -रोहा,दि.२९(नंदकुमार मरवडे)
सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व आयसीआयसीआय लाॅम्बार्ड यांच्या रोहा तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे व श्री.रा.ग.पोटफोडे (मास्तर) विद्यालय खांब व एम.बी.मोरे इंग्लिश मेडिअम स्कूल धाटाव येथील बहुतांश विद्यार्थी व विद्यार्थांच्या पालकांना मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी सहयोग फाऊंडेशन आरटीएस हेड विनय बर्वे,प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह प्रमुख जयश्री सानप,संस्थेचे सहा.शिक्षक दिपिका सानप, असिस्टंट सेवा सहयोग फाऊंडेशन प्रशांत अप्पर आदींसह तिन्ही विद्यालयातील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच विद्यार्थी वर्ग व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेल्मेट हे फक्त दंड टाळण्यासाठी घालायचे नाही, तर ते आपल्या जीवनाचे संरक्षण करणारे कवच आहे. अनेक वेळा अपघातात दुखापत होते किंवा जीव गमवावा लागतो. पण हेल्मेट वापरले असेल, तर अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.
—विनय बर्वे,सहयोग फाऊंडेशन आरटीएस हेड
विद्यार्थी वर्ग व पालक वर्गाच्या सुरक्षिततेसाठी या संस्थेने अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतला असून असे उपक्रम म्हणजे काळाची गरज आहे.
– दिपक जगताप, मुख्याध्यापक श्रमिक विद्यालय चिल्हे,ता.रोहा




Be First to Comment