Press "Enter" to skip to content

नडवली येथे श्री.राम जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने साजरा


खांब,दि.२७(नंदकुमार मरवडे)

रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील श्री.क्षेत्र नडवली येथे श्री.राम जन्मोत्सव सोहळा भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
या जन्मोत्सव सोहळ्या निमित्त श्रीं ना अभिषेक व पूजा,श्री.रामजन्म व्याख्यान,पाळणा सोहळा, प्रवचनकार रविकांत वेदक यांची प्रवचनरूपी सेवा, श्री.सत्यनारायणाची महापूजा, खांब पंचक्रोशीतील भाविक भक्त व नडवली ग्रामस्थ यांचे सामुदायिक हरिपाठ, हभप भूषण महाराज वरखले यांचे श्री.राम जन्मोत्सवावर आधारित हरी किर्तनरुपी सेवा, तद्नंतर महाप्रसाद व जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले.

खांब पंचक्रोशीत नडवली याच गावी प्रभू श्रीरामाचे एकमेव मंदिर असल्याने या मंदिरास या विभागात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने श्रीराम भक्तांनी येथे उपस्थिती नोंदवून श्रीरामाचे दर्शन घेऊन विविध प्रकारच्या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
या संपूर्ण सोहळ्याचे यशस्वीतेसाठी ग्रामस्थ व महिला मंडळ नडवली,श्री.राम मित्र मंडळ नडवली व उदय व्यायाम मंडळ नडवली यांनी मोलाचे सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.