

पुणे प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित पुणे शहर शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नूतन कार्यकारिणी कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये पुणे शहर अध्यक्षपदी श्री. विजय बामुगडे यांची तर जिल्हा सचिवपदी श्री. लक्ष्मण शिंदे यांची निवड सर्वानुमते निवड करण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण या विषयाच्या प्रगतीसाठी व शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रश्न सोडवणूकीसाठी या महासंघाच्या माध्यमातून राज्यभर कार्यकारिणीची निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्याची निवड सभा नुकतीच पार पडली. सदर निवड प्रक्रिया पुणे शहराचे मार्गदर्शक श्री. संजय कांबळे श्री . अँड्रूज विल्सन आणि महासंघाचे संस्थापक श्री. संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली.

जिल्हा कार्यकारणी पुढील प्रमाणे
श्री. विजय रमेश बामुगडे यांची पुणे शहर अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष पदी श्री. निखिल सातव, श्री. प्रमोद पायगुडे, श्री. दीपक चव्हाण , कार्याध्यक्ष पदी श्री.सुशांत बिरा ठेंगले सचिवपदी श्री. लक्ष्मण बाबुराव शिंदे सहसचिव पदी श्री. हरीश बिराजदार ,श्री.ऋषी दुबे खजिनदारपदी श्री.संदीप भगत सह. खजिनदारपदी श्री. हर्षल साठे , जिल्हा संघटकपदी सौ. मेघाराणी देशमुख, सौ.स्वाती भोगले, श्री. नवनाथ कोंडे , श्री. सौरभ गावडे यांची निवड झाली आहे. तसेच पुणे शहर सदस्य म्हणून श्री. स्वप्नील चौधरी , श्री. पप्पू यादव , श्री.अलीम शेख, श्री. निखिल इंगळे , श्री. वशिम शेख , सौ. आरती काळभोर पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री. नितीन शेटे तर पुणे शहर सह प्रसिद्धी श्री.कुमार निम्मे श्री. सुनील पवार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे संचलित महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांच्या व तालुक्यांच्या कार्यकारणींची निवड प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये पुणे शहर कार्यकारणी नुकतीच पार पडली.
कार्यकारणीची निवड प्रक्रिया जिल्हा मार्गदर्शक श्री. संजय कांबळे ,
श्री.अँड्रूज विल्सन आणि महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.संदिप मनोरे व सचिव प्रा.तायाप्पा शेंडगे व सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली. निवड झालेल्या नूतन कार्यकारणीचे जिल्ह्यातील शिक्षण क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमी यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




Be First to Comment