Press "Enter" to skip to content

माही गणेश तेलंगे हिने पटकावला प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यात १ ला व राज्यात ३३ वा क्रमांक


रोहा,दि.२४(नंदकुमार मरवडे)

रा.जि.परिषद प्राथ.शाळा सोनगाव येथील विद्यार्थीनी माही गणेश तेलंगे हिने प्रज्ञा शोध परीक्षेत सुयश संपादित करून जिल्ह्यात १ ली व राज्यात 33 वी क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षा २०२६ ही परीक्षा दि. रोजी द.ग तटकरे माध्य.विद्यालय कोलाड, ता. रोहा येथे झाली होती. या परीक्षेत रा.जि. परिषद प्राथ. शाळा सोनगाव येथील इ.४ थी मध्ये शिक्षण घेत असलेली कुमारी माही गणेश तेलंगे हिने पेपर क्रमांक एक भाषा व गणित १५० पैकी १२८ गुण व पेपर क्रमांक दोन इंग्रजी व बुद्धिमत्ता १५० पैकी ९८ असे ३०० पैकी २२६ एकूण गुण ( शे.७५:३३ %) मिळवून रायगड जिल्ह्यात १ ली ( प्रथम क्रमांक) व महाराष्ट्र राज्यातील ३३ क्रमांकावर उत्तुंग भरारी घेत उज्वल यश प्राप्त केले आहे.

कुमारी माही तेलंगे हिच्या यशामध्ये तिची आई-वडील गणेश उत्कर्षा गोळे,राजिप शाळा सोनगाव शाळेतील इ. ४ थी चे वर्गशिक्षक तथा रा.जि. परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक ब्रिजेश बाळकृष्ण भादेकर सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक संतोष लक्ष्मण धोत्रे यांचा मोलाचा वाटा आहे.तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा व कौतुकांचा वर्षाव होताना दिसत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.