Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये डॉक्टरांचा ‘जश्न-ए-ईद’ सोहळा उत्साहात संपन्न


पनवेल / प्रतिनिधी
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने रमजान ईदनिमित्त ‘जश्न-ए-ईद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पनवेल मधील काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते. सर्व डॉक्टरांमध्ये स्नेहभाव आणि सलोखा वाढावा, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात ५० हून अधिक डॉक्टरांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक लतीफ शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डॉ. आरिफ दाखवे यांनी भूषवले.त्यांच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी रमझान महिन्याचे महत्व सांगून सर्व धर्मातील उपासाचे अध्यात्मिक व वैज्ञानिक अधिष्ठान अधोरेखित केले.
विशेष म्हणजे, उपस्थित सर्व डॉक्टरांनी पारंपारिक पेहराव परिधान करून ईदचा आनंद लुटला.

डॉ. अमित दवे यांनी कार्यक्रमाचे मराठी आणि उर्दूतून खुमासदार सूत्रसंचालन केले.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांनी संघटनेच्या कार्यविस्ताराबद्दल अवगत करत सर्व उपस्थितांचे आभार मानले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. फिरोज शेख, डॉ. अमिना कच्छी, डॉ. इस्माईल शेख, डॉ. महेक पठाण, डॉ. सना सिलोत्री आणि डॉ. ताझिन मुल्ला यांनी अथक परिश्रम घेतले.
काँग्रेस भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आणि स्नेहभोजनाचा आस्वाद घेत सर्व डॉक्टरांनी उत्साहात सहभाग घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.