

पनवेलच्या निहाल भोईरला अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत कांस्य पदक ; श्रीजय भगतचा ‘टॉप ८’ मध्ये समावेश
पनवेल | प्रतिनिधी
जालंधर (पंजाब) येथे पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या खेळाडूंनी आपली मोहोर उमटवली आहे. ‘तायक्वांडो असोसिएशन ऑफ पनवेल शहर’चा खेळाडू कु. निहाल संजय भोईर याने पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात अटीतटीच्या लढतीत कांस्य पदक पटकावले. याच स्पर्धेत श्रीजय हरेश्वर भगत याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ‘टॉप ८’ मध्ये स्थान मिळवले आहे.
अखिल भारतीय स्तरावर रायगड जिल्ह्याला अशा प्रकारचे यश मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या कष्टाच्या जोरावर पनवेलचे नाव राष्ट्रीय क्रीडा नकाशावर कोरले आहे.
सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव
या ऐतिहासिक यशाबद्दल पनवेल महानगर पालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, जेष्ठ पत्रकार तथा रिपाइं पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्यासह तायक्वांडो क्षेत्रातील मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यामध्ये तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप ओंबासे, सरचिटणीस अमजदखान (गफार) पठाण, आणि खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी देखील अभिनंदन केले आहे
तसेच पनवेल शहर तायक्वांडो असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. प्रज्ञा संदीप भगत, सचिव संजय नागा भोईर, खजिनदार हेमंत कोळी, सहसचिव संदीप भगत, वीर तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष हरेश्वर भगत आणि सदस्य निखिल भोईर यांनी या खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




Be First to Comment