Press "Enter" to skip to content

सुबोध विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांची एमटीएस स्पर्धा परीक्षेत गरूडझेप

पेण, ता. २३ (वार्ताहर) : पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई वि.देव प्राथमिक विदयालय येथील अकरा विद्यार्थ्यांनी एमटीएस (महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा) २०२५- २०२६ या परीक्षेत राज्यस्तरीय यश संपादन करून गरुड झेप घेतली आहे.नुकताच झालेल्या एमटीएसच्या स्पर्धा परीक्षेत या शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी अनुश्री सोमनाथ पाटील हि राज्यात अकरावी तर जिल्ह्यात पहिली आली आहे.ईश्वरी अनिल यादव राज्यात सतरावी जिल्ह्यात तिसरी तर वेदांत सचिन खैरनार राज्यात बाविसवा जिल्ह्यात चौथा, इयत्ता तिसरी मधील

सान्वी दिनेश पवार राज्यात दुसरी जिल्ह्यात पहिली, चिन्मय दुर्गेश वारगुडे राज्यात दहावा जिल्ह्यात दुसरा, तर हार्दिक मोहन पाटील राज्यात चोवीसावा जिल्ह्यात चौथा, तर इयत्ता चौथीतील श्रीमयी तुकाराम बर्गे राज्यात दुसरी जिल्ह्यात पहिली, कैवल्य शरद उदार राज्यात नववा जिल्ह्यात दुसरा, लाभ राजेश कोठेकर राज्यात पंधरावा जिल्ह्यात तिसरा, अनुज पांडुरंग पडळकर राज्यात सोळावा जिल्ह्यात चौथा, स्वरूप विश्वनाथ ठाकूर राज्यात सतराव्या जिल्ह्यात पाचवा आला असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा, सर्व संचालक, मुख्याध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच पालक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.