Press "Enter" to skip to content

नगरसेविका कु.आर्या जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.14 च्या महाविकास आघाडीच्या नगरसेविका कु.आर्या प्रवीण जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचे औचित्य साधून शहरातील कापड बाजार येथे करण्यात आले.

सदर जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन मा.आ.बाळाराम पाटील व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रविण जाधव, विरोधी पक्ष नेता अरविंद म्हात्रे, गट नेता केतन भगत, नगरसेवक लतीफ शेख, प्रकाश म्हात्रे, नगरसेविका मनीषा म्हात्रे, दीपक घरत, खांदा वसाहत शिवसेना शहर प्रमुख सदानंद शिर्के, कळंबोली शिवसेना शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, महिला संघटीका उज्वला गावडे, अश्‍विनी देसाई, पत्रकार संजय कदम आदी यावेळी उपस्थित होते.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.