Press "Enter" to skip to content

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय

अशोक खरातची संगत भोवली ; रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा

मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील

भोंदूबाबा आणि कॅप्टन अशोक खरातला बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. पण, या नराधम आणि विकृत अशोक खरात सोबत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. एवढंच नाहीतर रुपाली चाकणकर यांनी या बलात्कारी बाबाचे पाय सुद्धा धुतल्याचे व्हिडीओ समोर आले होते. विरोधकांनी या प्रकरणी चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. अखेरीस रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर पुरत्या अडचणीत सापडल्या होत्या. दररोज नव नवीन व्हिडीओ आणि फोटो समोर येत होते. एवढंच नाहीतर राष्ट्रवादीतूनही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी तर उघडपणे चाकणकरांवर टीकेची संधी सोडली नाही. त्यामुळे संध्याकाळी राजकीय घडामोडींना वेग आला. चाकणकरांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना तातडीने राजीनामा देण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्यात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये चाकणकर यांनी आपली बाजू मांडली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी चाकणकर यांचा राजीनामा स्वीकारला.आता पुढे काय होते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.